प्रश्न विचारा, माहिती मिळवा आणि भ्रष्टाचारावर लगाम घाला!
14/11/2025परवानग्यांचा तिढा; प्रकल्प रखडल्याने बिल्डर, ग्राहक, सगळेच अडचणीत!
14/11/2025TP | DP | RP रोड रखडले: ट्रॅफिक जामचे मूळ कारण आणि MSDA चा उपाय

-
डेव्हलपमेंट प्लॅन रोड (DP Road), रिजनल प्लॅन रोड (RP Road) अथवा टीपी स्कीममधील रोड (TP Road).
-
सध्या उपलब्ध असलेल्या रस्त्यांना पर्यायी वाहतुकीची सोय म्हणून नव्याने तयार करावयाचे रस्ते.
- वर्तमान वस्तुस्थिती: डेव्हलपमेंट प्लॅनचे नकाशे पाहिल्यास हे रस्ते सुनियोजित वाटतात, परंतु प्रत्यक्षात त्यातील ५०% पेक्षा जास्त रस्ते सुद्धा तयार झालेले नाहीत.
अ. अतिक्रमण आणि समाजकंटकांचा हस्तक्षेप
-
अतिक्रमणाची पद्धत: डीपी रोडवर धार्मिक स्थळे बांधणे, झोपड्या टाकणे किंवा बेकायदेशीर प्लॉटिंग करणे अशा समाजविघातक कृती केल्या जातात.
-
स्वार्थ साधणे: अशा प्रकारे जमिनी ताब्यात घेऊन, निम्म्या दरात त्या आपल्या पदरात पाडून घेण्याची पद्धत काही समाजकंटकांनी पाडली आहे.
-
विरोध: हेच समाजकंटक अनेकदा डीपी रोडचे काम रखडवतात. रस्त्याच्या मध्यभागी बांधलेल्या धार्मिक स्थळे/घरे यांना शासनाने हात लावल्यास, ते गाव गोळा करून विरोध करतात आणि 'गरिबांचे हाल होत असल्याची आवई' उठवतात. अशावेळी शासन हतबल होते आणि त्यांना माघार घ्यावी लागते.
ब. मोबदल्याची अनिश्चितता आणि विलंब
-
मोबदल्याची अनिश्चितता: ज्या जागा मालकांच्या जमिनी रस्त्यात जातात, त्यांना जागेचा मोबदला नक्की कधी मिळणार, याबद्दल कोणतीही निश्चिती नसते.
-
दीर्घ कालावधी: काही प्रकरणात हा मोबदल्याचा कालावधी २० वर्षांपर्यंत गेला आहे.
-
टीडीआरमधील गोंधळ: महापालिका मोबदला दोन प्रकारे देते: कॅश नाहीतर टीडीआर (TDR). टीडीआर (Transferable Development Rights) देण्यात 'कच्चा' आणि 'पक्का' टीडीआर हे कायद्याच्या कोणत्याच पुस्तकात नसलेले घोळ करून, पालिकेने आजवर प्रचंड रोष ओढवून घेतला आहे.
१. मार्किंग आणि जॉईट मेजरमेंट शीट (JMS) त्वरित द्या:
-
जे डीपी रोड नकाशावर दाखवले गेले आहेत, त्या रस्त्यांचे मार्किंग शासकीय फी भरून डीपी फायनल झाल्यापासून एका वर्षाच्या आत जागेवर पूर्ण करावे.
-
सरकारने वेळेत जॉईट मेजरमेंट शीट (JMS) तयार करावी.
२. टीडीआर (DRC) सर्टिफिकेट ४८ तासांत ऑनलाइन:
- राज्यातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका, पीएमआरडीए आणि सर्व संस्थांनी त्यांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व DP रोडचे मार्किंग एका वर्षात पूर्ण करावे.
- मोजणी पूर्ण झाल्यापासून ४८ तासात टीडीआर (DRC सर्टिफिकेट) जागेच्या मालकाला ऑनलाइन उपलब्ध करून द्यावा.
३. टीडीआर विक्रीत पारदर्शकता:
- टीडीआर विकताना त्या कुटुंबाची वंशावळ खातरजमा करून विकावी. जेणेकरून टीडीआरच्या विक्रीत कायदेशीर स्पष्टता राहिल आणि कुणी कोर्टात गेले तरी DP रोड अडवू शकणार नाही.
४. कॅश मोबदल्यासाठी क्रेडिट नोट सिस्टीम:
-
ज्या ठिकाणी कॅश मोबदला देणे आवश्यक आहे, तिथे 'बजेट नाही' हे कारण पालिका देते. अशा मालकांना 'क्रेडिट नोट सिस्टीम' चालू करावी.
-
या क्रेडिट नोटचा वापर करून सदर व्यक्ती पालिकेच्या हद्दीत काम करणाऱ्या डेव्हलपरकडे ऑफिस, दुकान, किंवा निवासी गाळा खरेदी करू शकेल.
MSDA ने मांडलेले उपाय प्रशासकीय कार्यपद्धतीत वेळेची मर्यादा आणि पारदर्शकता आणणारे आहेत. टीडीआर त्वरित देणे आणि क्रेडिट नोट सिस्टीम लागू करणे, हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठा दिलासा ठरू शकते. MSDA ने सरकारी कारभार सुरळीत आणि लोकाभिमुख करण्याचा विडा उचलला आहे.
ट्रॅफिक जामचा गुंता सोडवा: DP/TP रोड मार्किंग आणि मोबदला 48 तासात देण्याची MSDA ची आक्रमक मागणी


