तुमचा ७/१२ उतारा आणि नकाशा चुकीचा आहे?
13/11/2025झोनिंग
13/11/2025
जागा खरेदी-विक्री प्रक्रिया
विक्री करारनामा ते मालकी हक्क हस्तांतरण : जमीन खरेदी करताना कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रे कशी तपासावी?
जागा म्हणजे आपली अमूल्य संपत्ती. तिची खरेदी-विक्री करताना अनेक छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. चुकीची माहिती किंवा घाई केल्यास नंतर त्रास होऊ शकतो. म्हणूनच ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.
जागेची शोधाशोध
- सर्वप्रथम, आपल्याला हवी असलेली जमीन कुठे पाहिजे हे ठरवा (गावात, शहराजवळ, शेतीसाठी, घरासाठी, व्यवसायासाठी इ.).
- ब्रोकर/एजंट/ऑनलाइन प्लॅटफॉर्म यांच्यामार्फत माहिती घ्या.
- आसपासची सुविधा, रस्ता, पाणी, वीज आहे का हे पाहा.
करारनाम्यासाठी तयारी
- जमीन घ्यायची नक्की झाल्यावर सुरुवातीला:
- करारनामा तयार केला जातो.
- यामध्ये जमीन, किंमत, अटी व नियम लिहिले जातात.
- थोडी रक्कम दिली जाते.
- ह्या करारनाम्यावर नोंदणी होऊ शकते, तर काही वेळा ती बिननोंदणीकृत असते.
जमीन कागदपत्रांची तपासणी
- जमीन पाहिल्यावर सर्वात महत्वाचे म्हणजे तिची कागदपत्रे तपासणे :
- ७/१२ उतारा व फेरफार नोंद : जमीन कोणाच्या नावावर आहे हे पाहण्यासाठी.
- गावनमुनाव्याचा नकाशा : जमीन गाव नकाशात कुठे आहे हे तपासण्यासाठी.
- NA प्रमाणपत्र : (घर/व्यवसायासाठी) किंवा शेती जमीन असल्याचे प्रमाणपत्र.
- प्रॉपर्टी कार्ड : शहरात असल्यास.
- भूधारक नोंद, वारसा हक्क, कर्ज आहे का, वादग्रस्त तर नाही ना? याची खातरजमा करा.
- Legal Advocate च्या मदतीने सखोल पडताळणी करणे हिताचे असते.
खरेदीखत तयार करणे व नोंदणी
- खरेदीखत तयार करणे (Sale Deed): जमीन पूर्णपणे खरेदी करण्यासाठी खरेदीखत तयार होते. हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे.
- स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क भरणे : खरेदीखतासाठी सरकारकडे स्टॅम्प ड्युटी व नोंदणी फी भरावी लागते. ही रक्कम जमिनीच्या बाजारमूल्यावर अवलंबून असते.
- खरेदीखताची नोंदणी :
- खरेदीखत नोंदणी कार्यालयात रजिस्टर करावा लागतो.
- विक्रेता व खरेदीदार दोघंही नोंदणी कार्यालयात जातात.
- ID Proof, फोटो, बायोमेट्रिक घेतले जाते.
- अधिकारी तपासून खरेदीखत नोंद करतो.
मालकी हक्क हस्तांतरण
- फेरफार व नवा ७/१२ उतारा मिळवणे: खरेदीखत झाल्यावर, तालुक्यातील महसूल विभागात फेरफारासाठी अर्ज करावा लागतो. जमीन आपल्या नावावर करण्यासाठी. काही आठवड्यांत नवीन ७/१२ उतारा आपल्या नावावर येतो.
- मालकी नोंद व पुढील प्रक्रिया: प्रॉपर्टी कार्ड, भूमिअधिकार पत्र, कर भरणा यासाठी संबंधित कार्यालयात नोंदणी करावी लागते. आता ती जमीन अधिकृतपणे आपल्या मालकीची होते.
निष्कर्ष : योग्य माहिती, कागदपत्रांची पडताळणी आणि कायदेशीर मार्गाने केलेला व्यवहार तुम्हाला सुरक्षित ठेवतो आणि भविष्यात कुठलाही त्रास होण्यापासून वाचवतो.


