घर घेण्यापूर्वी तपासा: BCC (इमारत पूर्णता प्रमाणपत्र)
12/11/2025‘Court Stay’ असलेली जमीन खरेदी करत असाल तर सावधान! जाणून घ्या धोके आणि पडताळणीची पद्धत.
12/11/2025पोट खराब क्षेत्र : ७/१२ उताऱ्यावरील नोंदीचा अर्थ
पोट खराब क्षेत्र म्हणजे जमिनीचा तो भाग, जो लागवडीसाठी पूर्णपणे अयोग्य आहे किंवा सार्वजनिक उपयोगासाठी राखून ठेवलेला आहे. या क्षेत्राची नोंद ७/१२ उताऱ्यावर केली जाते, ज्यामुळे शेतकऱ्याला त्याच्या लागवडीयोग्य क्षेत्राची (Cultivable Area) अचूक माहिती मिळते.
सातबारा उतारा वाचताना आपल्याला पोट खराब क्षेत्राचे मुख्यतः दोन प्रकार दिसतात: पोटखराबा 'अ' आणि पोटखराबा 'ब'.
| प्रकार | स्पष्टीकरण | महसूल आकारणी | लागवड करण्याची स्थिती |
| पोटखराबा 'अ' | भूमापन (Survey) करताना कृषी अयोग्य म्हणून घोषित केलेले क्षेत्र. यामध्ये धारकाच्या कृषी क्षेत्रावरील इमारती किंवा खळ्याचा समावेश होतो. | यावर आकारणी (Taxation) केली जात नाही. | धारकास कोणत्याही प्रकारची लागवड करता येते. |
| पोटखराबा 'ब' | सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जमीन (उदा. रस्ते, पदपथ, दहन/दफन भूमी, गावातील तलाव, ओढा, कुंभारकामासाठी राखीव जमीन). | यावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी केली जात नाही. | ही जमीन लागवडीखाली आणता येत नाही. |
BCC का दिला जातो?
या दोन प्रकारांबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार स्पष्ट नियम आहेत:
अपवाद (पोटखराबा 'ब' साठी): तलाव किंवा ओढ्याने व्यापलेल्या जमिनीच्या बाबतीत, जर त्या ओढ्याच्या/तलावाच्या पाण्याने फक्त धारकाच्या मालकीच्या जमिनीस पाणीपुरवठा होत असेल, किंवा धारकास कोरड्या पात्रात लागवड करण्याचा विशेष अधिकार असेल, तर हा नियम लागू होणार नाही.
पीक पाहणी आणि आकारणीबाबत नियम
पोट खराब क्षेत्राची पीक पाहणी करता येते का, याबद्दल अनेक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज आहेत.
निष्कर्ष : पोट खराब क्षेत्र म्हणजे जमिनीचा अनुत्पादक भाग होय, ज्यावर महसूल आकारणी केली जात नाही. शेतकऱ्यांनी पोट खराब 'अ' आणि 'ब' मधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण 'अ' प्रकारातील जमीन लागवडीखाली आणता येते, तर 'ब' प्रकारातील जमीन सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असते आणि ती लागवडीसाठी वापरता येत नाही.

पोट खराब क्षेत्र
७/१२ उताऱ्यावर पोट खराब क्षेत्र
सातबारा उतारावर पोट खराब क्षेत्र पाहून अनेक वेळा शेतकरी या क्षेत्राची माहिती विचारतात. परंतु अनेक शेतकऱ्यांना माहिती नसलयाने याबाबत जास्त माहिती मिळत नाही.
शेतकरी वर्गाकडून सदर क्षेत्र हे लागवडीखाली असल्याने आमचे क्षेत्र वाढवून द्या. पीक पाहणी सदरी नोंद करा अशी अर्जाद्वारे मागणी होते व आपली अडचण होते. जेव्हा आपण सातबारा वाचन करतो त्यावेळी आपण सातबारा उताऱ्यावर लागवडी लायक क्षेत्र बाहेरच पोट खराब क्षेत्र दोन प्रकार दिसतात.
१) पोटखराबा अ
२) पोटखराबा ब
आपण या दोन प्रकारच्या पोटखराबाची सविस्तर माहिती पाहू.
१) पोटखराबा अ - जिच्या भूमापनचे वेळी कृषी अयोग्य म्हणून घोषित वर्गवारी करण्यात आलेले आहे. अशी जमीन यामध्ये धारकाच्या कृषी क्षेत्रावरील इमारती किंवा खळ्याचा
समावेश होतो. यावर आकारणी करण्यात येत नसते.
२) पोटखराबा ब - सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जमीन रस्ता मान्य पदपथ यासाठी राखीव जमीन तसेच पिण्यासाठी किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरण्यात येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली जमीन, कोणत्याही जाती जमातीकडून दहन भूमी किवा दफन भूमी म्हणून वापरण्यात येणारी जमीन, तसेच गावातील कुंभार समाजासाठी कुंभार कामासाठी अभिहस्तन्तरीत केलेले जमीन या सर्व जमिनीवर कोणत्याही प्रकारची महसुल अकारणी करण्यात येत नाही.
कोणता पोट खराब जमीन लागवडीखाली आणता येईल?
पोटखराबा अ- प्रकारची जमीन धारकास कोणत्याही लागवडीखाली आणता येईल आणि अशी जमीन आकारणी योग्य असणार नाही.
पोटखराबा ब- या प्रकारची जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 43 नुसार लागवडीखाली आणता येणार नाही.
अपवाद-
तलाव किंवा ओढा याने व्यापलेल्या जमिनीच्या बाबतीत जेव्हा अशा तलावाच्या किंवा वड्याच्या जलसिंचनजी केवळ वापर करण्यात येत असेल आणि धारकाच्या एकमेव भोगवट्यात असलेल्या जमिनीसच त्यामुळे पाणीपुरवठा होत असेल किंवा तलाव/ओढा
कोरड्या पत्रात लागवड करण्याच्या घरच्या विशेष अधिकारास मान्यता देण्यात येत असेल तेव्हा उपरोक्त नियम जमिनीस लागू होणार नाही.
पोटखराब क्षेत्राची पीक पहाणी करता येते का?
पोट खराब अ - प्रकारची पिकपहाणी नोंद गाव नमुना ७/१२ वरील १२ मध्ये करता येते
अशा क्षेत्राची पीक पाणी करता येत नाही हा बन्याच लोकांचा गैरसमज आहे. परंतु असे
क्षेत्राचे आकारणी करता येत नाही.
पोट खराब क्षेत्राची आकारणी करता येते का?
पोट खराब अ प्रकारची नोंद पीक पाणी सादरी करता येते परंतु आकारणीत करण्याचा
अधिकार मा. जमाबंदी आयुक्त यांना आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या जमिनीची पीक पाहणी
सदरी नोंद करून मा. तहसीलदार यांचे मार्फत प्रस्ताव मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर
करून आदेश प्राप्त झाल्यानंतर आकारणी करता येते.
प्रकार,स्पष्टीकरण,महसूल आकारणी,लागवड करण्याची स्थिती
पोटखराबा 'अ',भूमापन (Survey) करताना कृषी अयोग्य म्हणून घोषित केलेले क्षेत्र. यामध्ये धारकाच्या कृषी क्षेत्रावरील इमारती किंवा खळ्याचा समावेश होतो.,यावर आकारणी (Taxation) केली जात नाही.,धारकास कोणत्याही प्रकारची लागवड करता येते.
पोटखराबा 'ब',"सार्वजनिक प्रयोजनार्थ राखून ठेवलेली जमीन (उदा. रस्ते, पदपथ, दहन/दफन भूमी, गावातील तलाव, ओढा, कुंभारकामासाठी राखीव जमीन).",यावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी केली जात नाही.,ही जमीन लागवडीखाली आणता येत नाही.
कायदेशीर संदर्भ
महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर बंदी) नियम १९६७


