सेल डीड
13/11/2025सीलिंग कायदा
13/11/2025
नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक गोष्टी:
कायदेशीर कागदपत्रे :
खरेदीखत (Sale Deed)
मालमत्तेच्या विक्रीसंदर्भात विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात केलेला कायदेशीर करार.
इतर संबंधित कागदपत्रे :
- ७/१२ उतारा
- फेरफार उतारा
- मालमत्ता कर पावत्या
- विकास योजना मंजुरी (असल्यास)
- ओळखपत्रे (पॅन, आधार, फोटो)
शुल्क आणि फी :
* काही राज्यांमध्ये महिलांसाठी सवलत असते.
स्टॅम्प ड्युटी
ही मालमत्तेच्या किमतीनुसार आकारली जाते (उदा. ५-७%).
नोंदणी फी
ही साधारणतः 1% असते.
उपस्थिती व साक्ष
साक्षीदार (2 लोक)
जे नोंदणी दरम्यान उपस्थित असतात आणि सही करतात.
नोंदणीसाठी लागणारा वेळ आणि ठिकाण :
*वेळेचा अंदाजित कालावधी
नोंदणी ही एका दिवसात पूर्ण होणारी प्रक्रिया आहे (वकील आणि दस्तऐवज तयार असतील तर).
- एकूण वेळ: 3 ते 7 दिवस.
- विलंब होण्याची कारणे :
- खरेदीखत तयार करण्यात (2-3 दिवस).
- स्टॅम्प ड्युटी भरण्यात (ऑनलाइन/बँकेद्वारे).
- अपॉईंटमेंट मिळवण्यात (मोजक्या नोंदणी कार्यालयांमुळे थोडी प्रतीक्षा).
- नोंदणीचे ठिकाण :
- सब-रजिस्ट्रार ऑफिस (Sub-Registrar Office): तुमच्या जिल्ह्यातील कोणत्या ही सब रजिस्ट्रार कार्यालयात ह्याची नोंद होते.
- आता अनेक राज्यांत ई-नोंदणी प्रणाली सुरु झाली आहे - यात ऑनलाईन वेळ बुकिंग, फी भरणे आणि काही बाबतीत दस्तऐवज स्कॅन करून अपलोड करता येतात.
नोंदणी प्रक्रिया


