झोनिंग
13/11/2025टाउन प्लॅनिंग
13/11/2025स्टॅम्प ड्युटी: मालमत्ता व्यवहारातील आवश्यक सरकारी कर
घर, जमीन किंवा फ्लॅट खरेदी करताना भरायचा कायदेशीर कर म्हणजे स्टॅम्प ड्युटी. हा कर व्यवहाराला कायदेशीर मान्यता देतो, मालमत्तेचा हक्क सुरक्षित करतो आणि भविष्यात वाद निर्माण झाल्यास कागदपत्र न्यायालयात ग्राह्य धरले जातात. महाराष्ट्रात याचे दर शहर, मालमत्तेचा प्रकार आणि खरेदीदाराच्या लिंगानुसार बदलतात.
स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय?
स्टॅम्प ड्युटी ही एक प्रकारची सरकारी कर आहे. जेंव्हा आपण एखादी मालमत्ता (जमीन, घर, फ्लॅट) खरेदी करतो, तेंव्हा त्या व्यवहारावर सरकारकडून घेतली जाणारी ही कायदेशीर फी म्हणजेच स्टॅम्प ड्युटी. हा कर आपण व्यवहार करताना (जसे की सेल डीड लिहिताना) सरकारी खजिन्यात भरतो. यामुळे सरकार त्या व्यवहारास कायदेशीर मान्यता देते

स्टॅम्प ड्युटी का महत्वाची आहे?
महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी किती आहे ?
मालमत्ता कोणत्या शहरात आहे, ती निवासी आहे की व्यावसायिक, खरेदीदार स्त्री आहे की पुरुष यावर स्टॅम्प ड्युटीचे दर वेगळे असतात.
- पुणे, मुंबई, ठाणे – अंदाजे 5% स्टॅम्प ड्युटी
- स्त्री खरेदीदारासाठी काही सूट लागू होते
- ग्रामपंचायत भागात थोडी कमी ड्युटी असते
स्टॅम्प ड्युटी कशी भरावी ?
- ऑनलाइन: https://gras.mahakosh.gov.in या महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून ड्युटी भरता येते.
- बँकेद्वारे चलनः जवळच्या बँकेतूनही ड्युटी भरता येते .
- स्टॅम्प पेपरद्वारेः पूर्वी मोठ्या रक्कमांसाठी स्टॅम्प पेपर घेतले जात, आता बहुतांश व्यवहार ई-चलनाने होतात.
MSDA कशी मदत करू शकते ?
जर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, नोंदणी, कागदपत्रे याबद्दल मार्गदर्शन हवे असेल, तर MSDA – Medium Scale Developers Association कडून योग्य सल्ला, प्रोसेस मार्गदर्शन आणि कागदपत्रात मदत मिळू शकते.
निष्कर्ष : स्टॅम्प ड्युटी म्हणजे व्यवहारावर भरावयाचा कायदेशीर कर आहे. हा भरल्याशिवाय मालमत्तेचा व्यवहार पूर्ण मानला जात नाही. त्यामुळे मालमत्ता खरेदी करताना स्टॅम्प ड्युटी ही खर्चाची महत्त्वाची बाब आहे हे विसरू नका.


