बिल्डर चेकलिस्ट
13/11/2025फ्रीझ जमीन : कायदेशीर बंधने आणि व्यवहारांचे धोके
13/11/2025
सार्वजनिक बांधकाम विभाग : राज्याच्या पायाभूत विकासाचा आधारस्तंभ
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) हा राज्यातील रस्ते, पूल, शासकीय इमारती आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणी व देखभालीसाठी जबाबदार प्रमुख विभाग आहे. रस्ते व महामार्गांचे बांधकाम, पूल उभारणी, सरकारी इमारतींचे निर्माण, तसेच जलसंपदा आणि सार्वजनिक सुविधा प्रकल्पांद्वारे हा विभाग राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावतो.
PWD चे महत्व :
गाव ते शहर विकासात मोठा वाटा
दळणवळण सुलभ होत असल्याने व्यापार व विकास वाढतो.
सुरक्षा व सुविधा
सुरक्षित रस्ते व पूल यामुळे अपघात कमी होतात.
PWD चे मुख्य कामकाज :
रस्ते व महामार्ग :
- गाव ते तालुका, तालुका ते जिल्हा, तसेच जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे बांधकाम.
- नवीन रस्त्यांची निर्मिती, जुन्या रस्त्यांचे रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण.
- दुरुस्ती व देखभाल.
पूल व इतर संरचना :
- नद्या, ओढे, नाल्यांवर पूल बांधणे.
- लहान पुल (Culvert), मोठे पुल (Major / Minor Bridges) बांधणे.
- पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट व देखभाल.
शासकीय इमारती :
- जिल्हाधिकारी कार्यालये, पंचायत समित्या, शासकीय दवाखाने, शाळा, महाविद्यालये, पोलीस स्टेशन आदी इमारतींची उभारणी.
- सरकारी वसाहती (क्वार्टर्स).
जलसंपदा व सिंचन संबंधित बांधकाम :
- काही ठिकाणी PWD जलवाहिन्यांचे, बंधाऱ्यांचे लहान प्रकल्प सुद्धा करते.
सार्वजनिक उद्याने व इतर सुविधा :
- शासकीय उद्याने, चौक, स्मारके, सार्वजनिक शौचालये.
PWD च्या प्रकल्पांचे व्यापक स्वरूप :
ग्रामीण व शहरी विकास :
- PWD कडून ग्रामीण रस्ते (PMGSY अंतर्गत), तसेच शहरातील महत्त्वाचे रस्ते व उड्डाणपूल बांधले जातात.
- गावातील रस्ते पक्का करणे, पावसाळ्यातील चिखल कमी करणे यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो.
सामाजिक प्रकल्प :
- शासकीय शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांची बांधणी.
- आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये (PHC, CHC) उभारणे.
- पोलीस ठाणे, फायर स्टेशन, जिल्हा न्यायालये.
पर्यटन व सांस्कृतिक प्रकल्प :
- ऐतिहासिक स्थळांचे जतन व नुतनीकरण (रेनोव्हेशन).
- पर्यटनस्थळांवर मूलभूत सुविधा उभारणे (पार्किंग, फूटपाथ, उद्याने).
PWD प्रकल्पांची प्रक्रिया :
प्रकल्प नियोजनः
- स्थानिक गरजा ओळखून DPR (Detailed Project Report) तयार करणे.
- भू-तपासणी , अंदाजपत्रक तयार करणे.
मंजुरी प्रक्रियाः
- राज्य शासन किंवा संबंधित प्राधिकरणाची मान्यता घेणे.
- आर्थिक मंजुरी , तांत्रिक मंजुरी .
ठेकेदारांची निवडः
- निविदा प्रक्रिया .
- पात्र ठेकेदारांना काम देणे.
बांधकाम व देखरेखः
- बांधकाम काम सुरू करणे, PWD अभियंते दररोज काम तपासतात.
- बांधकाम पूर्ण झाल्यावर Final Inspection होते.
हस्तांतर व देखभाल:
- काम पूर्ण झाल्यावर ते वापरासाठी सुरू करणे.
- दरवर्षी देखभालीचे काम PWD च करते.
PWD मध्ये पारदर्शकता व जनसहभाग :
ऑनलाईन ट्रॅकिंग:
- बहुतांश राज्यात PWD च्या वेबसाईटवरून कामांची माहिती, निविदा आणि खर्च पाहता येतात.
RTI व जनआढावाः
- नागरिक RTI द्वारे PWD प्रकल्पांची माहिती मागवू शकतात.
- काही ठिकाणी स्थानिक बैठकीत प्रकल्पांची प्रगती सादर केली जाते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
GIS व ड्रोन सव्र्व्हे
रस्त्यांचे, पुलांचे सर्व्हेक्षण साठी ड्रोनचा वापर.
M-Sand, Roller Compacted Concrete
नवनवीन बांधकाम साहित्य वापरून खर्च व वेळ कमी करणे.
Green Building व Eco-friendly प्रकल्प
शासकीय इमारती सोलर पॅनेल्स, रेनवॉटर हार्वेस्टिंगसह बांधणे.
निष्कर्ष : PWD हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी करणारे महत्वाचे यंत्रणा आहे.
दर्जेदार रस्ते, पूल, सरकारी इमारती यामुळे विकासाचा वेग वाढतो व सर्वसामान्य नागरिकांना थेट फायदा होतो.


