ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ : सामान्य ग्राहकांचा आधार
13/11/2025७/१२ उतारा, ८-अ, प्रॉपर्टी कार्ड आणि फेरफार नोंदी
13/11/2025
छोट्या भूखंडांवर यशस्वी प्रकल्प कसे उभारावेत?
योग्य नियोजन, कायदेशीर प्रक्रिया आणि FSI चा वापर करून विकास साधणे.
आजकाल जमिनीच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, आणि शहरांमध्ये मोठी जमीन मिळवणे हे सामान्य माणसासाठी कठीण झाले आहे. पण याच काळात छोट्या भूखंडांवर योग्य नियोजन आणि अंमलबजावणी केली, तर त्यावरही चांगले प्रकल्प उभारता येतात – स्वतःसाठी किंवा व्यवसायिक वापरासाठी.
चला तर मग पाहूया, छोट्या भूखंडावर प्रकल्प कसा तयार करायचा आणि काय काळजी घ्यावी लागत.
जमिनीची कागदपत्रे तपासा :
- प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्या भूखंडाची मालमत्तेची कागदपत्रे व्यवस्थित आहेत का ते तपासणे गरजेचे असते.
- ७/१२ उतारा
- फेरफार
- NA प्रमाणपत्र
- मालकी हक्क कोणी अडथळा करत नाही ना? जर ही कागदपत्रे शुद्ध असतील, तर पुढचा टप्पा सोपा होतो.
योग्य वास्तुविशारद :
- छोट्या जागेचा अधिक फायदा घेण्यासाठी तुम्हाला अनुभवी वास्तुविशारदाची गरज भासते. तेच तुमच्यासाठी :
- जागेचा योग्य वापर करून देतात.
- पार्किंग, वायुवीजन, प्रकाश यांचे नियोजन करतात.
- PMC/PCMC किंवा PMRDA कडून मंजुरीसाठी नकाशा तयार करून देतात.
मिनी प्रकल्प संकल्पना :
- छोट्या भूखंडावर तुम्ही खालीलप्रमाणे प्रकल्प उभारू शकता :
- गृहनिर्माण : १ किंवा २ BHK फ्लॅट्सचा लहान इमारत प्रकल्प .
- किरकोळ व्यवसायासाठी दुकान-घर : खालचा भाग दुकान व वरचा भाग घर.
- मिनी ऑफिस स्पेस : IT, स्टार्टअपसाठी छोटे ऑफिस युनिट.
- रेण्टल प्रॉपर्टी : IRK किंवा PG युनिट्स.
बांधकाम परवाने आणि मंजुरी :
- PMRDA, PMC, किंवा स्थानिक नगरपालिका यांच्याकडून बांधकाम परवानगी घ्या. त्यासाठी आवश्यक गोष्टी :
- संमत नकाशा
- स्ट्रक्चरल रिपोर्ट
- अग्निसुरक्षा (जर २ मजल्यांपेक्षा जास्त)
- जल आणि मलनिस्सारणाची योजना
बजेट आणि खर्च नियोजन :
- छोट्या प्रकल्पाचा अर्थही मर्यादित बजेट. त्यामध्ये समाविष्ट खर्च :
- बांधकाम खर्च
- मंजुरी व कायदेशीर फी
- आर्किटेक्ट आणि कंत्राटदार शुल्क
- जल आणि मलनिस्सारणाची योजना
मार्केटिंग आणि वापर :
- जर तुम्ही विक्रीसाठी प्रकल्प करणार असाल, तर :
- सोशल मीडिया प्रचार करा.
- लोकल एजंटशी संपर्क ठेवा.
- MSDA सारख्या संस्थेची मदत घ्या.
झोनिंग आणि FSI समजून घ्या :
- तुमचा भूखंड कोणत्या झोनमध्ये येतो (रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल) हे तपासा. त्यानुसार किती चटई क्षेत्र (FSI) मिळेल हे ठरते. उदाहरणार्थ, 1.0 FSI असला तर 1000 स्क्वे. फूटच्या भूखंडावर 1000 स्क्वे. फूट बांधकाम करता येते.
MSDA कशी मदत करू शकते?
- MSDA ही संस्था लहान आणि मध्यम बांधकाम व्यावसायिकांसाठी एक मजबूत आधार आहे.
- NA मंजुरी, RERA, कायदेशीर मार्गदर्शन
- वास्तुविशारद, वकील, परवाना सल्लागार
- सरकारी धोरणे समजावून देणे
- एकत्रित विकास संधी
निष्कर्ष : छोटा भूखंड असला तरी त्याचा योग्य वापर केला, तर त्यातून चांगले उत्पन्न आणि स्थैर्य मिळवता येते. नियोजन, कायदेशीर प्रक्रिया आणि योग्य मार्गदर्शन घेतले तर छोट्याशा जागेतही मोठे स्वप्न साकार करता येते.
🏘️ छोट्या भूखंडांवर यशस्वी प्रकल्प कसे उभारावेत?


