जमीन खरेदी करणे
13/11/2025स्टॅम्प ड्युटी
13/11/2025
झोन व झोनचे प्रकार: जमिनीचा उपयोग ठरवणारे 'झोनिंग' म्हणजे काय?
जुनी पद्धत, चुकीचे रेकॉर्ड आणि फेरफार नोंदीतील विलंब : जमिनीच्या नोंदीतील त्रुटी कशा सुधाराव्यात?
भारतासारख्या कृषिप्रधान देशात जमीन ही सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. परंतु, आजही जमिनीच्या मोजणी व नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत, ज्यामुळे शेतकरी व मालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
झोनचे प्रकार :
झोन का महत्वाचा आहे ?
- अनियमित बांधकाम होऊ नये म्हणून.
- रहिवासी आणि व्यावसायिक भाग वेगळे ठेवता येतात.
- वाहतूक, पर्यावरण, सुविधा याचं योग्य नियोजन करता येतं.
- सरकारला नगररचना आखायला सोपं जातं.
रेसिडेन्शियल झोन
घरं, सोसायट्या, फ्लॅटस इथं बांधता येतात.
हा झोन फक्त निवासासाठी वापरायचा असतो.
कमर्शियल झोन
दुकानं, ऑफिसेस, मॉल्स यांसाठी असतो.म्हणजे इथं व्यवसाय करता येतो.
इंडस्ट्रियल झोन
कारखाने, गोदामं, वर्कशॉप्स यांसाठी असतो.
म्हणजे उद्योगधंद्यांसाठी खास झोन.
ग्रीन झोन
शेतीसाठी राखलेला झोन.
इथं फारशा इमारती बांधता येत नाहीत.
मिक्सड युझ झोन
एकाच ठिकाणी घरं + दुकानं दोन्ही चालतील.
माझी जमीन कोणत्या झोनमध्ये आहे हे कसं कळतं?
तुमचं जमीन कोणत्या झोनमध्ये आहे हे स्थानिक नगररचना विभाग, TP योजना, किंवा डेव्हलपमेंट प्लॅन (DP) मॅप वरून कळू शकतं. MSDA सारख्या संस्थेची मदत घेऊनही तुम्हाला याची माहिती मिळू शकते.
MSDA कशी मदत करू शकते?
- तुमच्या जमिनीचा झोन शोधून देणे.
- झोन बदल (जसे की कृषी ते रेसिडेन्शियल) करता येईल का ते मार्गदर्शन करणे.
- तुमच्या प्रोजेक्टसाठी योग्य झोनिंग परामर्श देणे.
निष्कर्ष : झोन म्हणजे जमिनीचा उपयोग काय असणार हे ठरवणारा भाग. योग्य झोनिंगमुळे शहराचं नियोजन नीट होतं आणि प्रकल्प रितसर पद्धतीने पुढे जातात.


