अन्याय थांबवण्यासाठी आता MSDA Mobile App!
15/11/2025TDR चा घोळ आणि मोबदल्याची 20 वर्षांची प्रतीक्षा थांबवा! MSDA ची आक्रमक मागणी: DP रोड मार्किंग 1 वर्षात, TDR 48 तासात आणि कॅशऐवजी ‘क्रेडिट नोट’ देऊन प्रशासकीय क्रांती सुरू करा!
15/11/2025तलाठी करतात कोणती कामे? ७/१२ उतारा, फेरफार नोंद आणि कायदा सुव्यवस्था! तुमच्या गावचे महसूल अधिकारी कसे काम करतात, जाणून घ्या.
गाव पातळीवरील महसूल व्यवस्थापन: तलाठी आणि कोतवाल यांची भूमिका
महसूल वर्षाचे व्यवस्थापन:
- नवे महसूल वर्ष (१ ऑगस्ट) सुरू होण्यापूर्वी सर्व नोंदवह्यांचे पृष्ठांकन करून तहसीलदारांकडून स्वाक्षांकित करून घेणे.
- वार्षिक प्रशासनिक अहवाल संकलनासाठी आवश्यक ती माहिती १ ऑगस्टनंतर त्वरीत तहसीलदाराकडे पाठविणे.
जमीन व पीक तपासणी:
- खरीप (१५ ऑक्टोबरपूर्वी) आणि रब्बी (३१ डिसेंबरपूर्वी) पीक तपासणी, तसेच सीमा व भूमापन चिन्हांची तपासणी पूर्ण करणे.
- पिकांची पैसेवारी तयार करण्यास मंडल अधिकाऱ्यास साहाय्य करणे.
महसूल संकलन व जमा:
- जमीन महसूल वसूल करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला प्रसिद्धी देणे.
- जमा झालेल्या प्रत्येक महसुलाची शासनातर्फे पावती देणे.
- जमा महसूल १५ दिवसांच्या आत कोषागारात भरणे. (जवळ ₹१,०००/- पेक्षा जास्त रक्कम ठेवू नये.)
दस्तऐवज अद्ययावत ठेवणे:
- गाव नमुना ८-अ, सर्व महसूली लेखे, रोकड वह्या इत्यादी अभिलेख अद्ययावत ठेवणे.
- ७/१२ उतारे व प्रत पुरविणे.
कायदा व सुव्यवस्था:
- गावात किंवा गावाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणे.
- लहान गुन्हे, संशयास्पद हालचाली, चोरी, मारामारी इत्यादींची तातडीने माहिती वरिष्ठ पोलीस/तहसीलदारांना देणे.
- वाद, सामाजिक तणाव या स्थितीत मध्यस्थी करणे व हिंसाचार टाळणे.
अंमलबजावणी व सहाय्य:
- सरकारी आदेशांची व सूचनांची अंमलबजावणी करणे.
- पोलिस, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत यांना तपास व अंमलबजावणीसाठी सहाय्य करणे.
- निवडणुका, जनगणना, लसीकरण मोहीम इत्यादी ग्रामपंचायतीच्या कामकाजात मदत करणे.
- सार्वजनिक कार्यक्रम व सण उत्सवांच्या काळात सुरक्षितता सुनिश्चित करणे.
माहिती संकलन:
- गावातील नव्या व्यक्ती, परगावचे लोक आणि स्थलांतरित यांची माहिती ठेवणे.
महसूल आणि व्यवस्थेचा आधार: प्रत्येक तलाठी आणि कोतवालाचे कर्तव्य, गावच्या विकासाला नवी दिशा देणारे!
गाव पातळीवरील प्रशासन: तलाठी आणि कोतवाल यांची कर्तव्ये आणि महसूल व्यवस्थापनातील भूमिका
ग्रामविकास महसूल अधिकारी
गाव पातळीवरील महसूल व्यवस्थापन हा ग्रामविकासाचा एक मुलभूत आधार आहे. गाव पातळीवरील महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून तलाठी आणि कोतवाल हे दोघे खूप महत्त्वाची कामगिरी पार पाडतात.
१. तलाठी (Talathi)
तलाठी हा मंडल अधिकारीच्या हाताखाली काम करतो. तलाठ्याचे विशेष महत्त्वाचे काम म्हणजे महसुलाचा हिशोब व्यवस्थित ठेवणे.
तलाठयांची कर्तव्ये:
-
नोंदवहयांचे पृष्ठांकन: नवे महसूल वर्ष १ ऑगस्ट रोजी सुरू होते, त्यावेळेस तलाठ्याने सर्व नोंदवहयांवर पृष्ठांकन करून त्या कमीत कमी १५ दिवस अगोदर तहसीलदारांकडे पाठवून, १ ऑगस्टपूर्वी स्वाक्षांकित करून घ्यावयास पाहिजेत.
-
अहवाल सादर करणे:
-
वार्षिक प्रशासनिक अहवाल संकलनासाठी आवश्यक ती माहिती तहसीलदाराकडे १ ऑगस्टनंतर त्वरीत पाठविणे.
-
मोसमातील बदलांची नोंद, पिकांची स्थिती यांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविणे.
-
जमीन महसुलीबाबतच्या प्रगतीचा अहवाल तहसीलदाराला देणे.
-
जमिनीच्या वापरामधील बदलाचा दिनांक वरिष्ठ अधिकाऱ्याला कळविणे.
-
-
जमीन व पीक तपासणी:
-
खरीप पीक, सीमा व भूमापन चिन्हांची तपासणी १५ ऑक्टोबरपूर्वी केली पाहिजे.
-
३१ डिसेंबरपूर्वी रब्बी पीक, कुळवहिवाट, सीमा आणि भूमापन चिन्हांची तपासणी पूर्ण करावयास पाहिजे.
-
पिके, कुळवहिवाट, सीमा व भू-मापन चिन्हे, अतिक्रमण इत्यादींचे निरीक्षण करणे.
-
पिकांची पैसेवारी तयार करण्यास मंडल अधिकाऱ्यास साहाय्य करणे.
-
-
महसूल व्यवस्थापन:
-
जमीन महसूल वसूल करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला सर्वत्र प्रसिद्धी देणे.
-
जमा झालेल्या प्रत्येक जमीन महसुलाची शासनातर्फे पावती देणे.
-
जमा महसूल १५ दिवसांच्या आत कोषागारात भरणे.
-
तलाठ्याने आपल्याजवळ कोणत्याही परिस्थितीत शासनाची एक हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवता कामा नये.
-
-
दस्तऐवज अद्ययावत ठेवणे:
-
गाव नमुन ८-अ अदयायावत ठेवणे.
-
सर्व महसूली लेखे आणि रोकड वहया, कार्यभार अहवाल आणि इतर अभिलेख ठेवावयास पाहिजेत.
-
अधिकारलेखामध्ये नोंद शाईने अभिलेखीत करणे.
-
प्रमाणित नोंदीप्रमाणे गाव व गोषवारे दुरूस्त करणे.
-
७/१२ उतारे व प्रत देणे.
-
-
फेरफार व हक्क नोंदी:
-
हक्क नोंदीची पोच लेखी देणे.
-
फेरफार नोंदवहीत प्रतिवेदनाप्रमाणे नोंद करणे.
-
फेरफार नोंदीची प्रत जाहीरपणे प्रदर्शित करणे व संबंधितांना लेखी सूचना देणे.
-
विवादग्रस्त प्रकरणांची नोंद नोंदवहीत करणे.
-
वारसदार नोंदविण्याबाबत त्यासंबंधित कायदयांची माहिती करून घेणे.
-
-
इतर कर्तव्ये:
-
गावाची सीमा चिन्हे, भू-मापन चिन्हे सुस्थितीत ठेवणे.
-
खातेदारांना खातेपुस्तिका पुरविणे.
-
सरकारी नोटिसा किंवा आदेश प्रसिद्ध करणे.
-
निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करणे.
-
२. कोतवाल (Kotwal)
गावपातळीवर कोतवालची नेमणुक तलाठयाच्या हाताखाली महसुलाचे काम करण्यासाठी केलेली आहे. कोतवाल हा गाव-पातळीवर महसूल आणि पोलिस यंत्रणेतील एक २४ तास भूमिका बजावणारे व एकात्मिक अधिकारी आहेत. कोतवालची नेमणुक तहसीलदार यांचेमार्फत केली जाते. कोतवाल गाव किंवा शहराचा मुख्य पोलिस अधिकारी असतो.
कोतवालचे अधिकार:
-
गावात किंवा गावाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखणे.
-
लहान गुन्हे किंवा संशयास्पद हालचाली यांची माहिती गोळा करणे व पुढील तपासासाठी पोलिसांकडे देणे
-
गावात कोणताही गुन्हा घडल्यास त्याची तातडीने माहिती वरिष्ठ पोलिस किंवा तहसीलदार यांना देणे.
-
पोलिस, महसूल अधिकारी, ग्रामपंचायत यांना तपास व अंमलबजावणीसाठी सहाय्य करणे.
-
वाद, सामाजिक तणाव इ. स्थिती उद्भवल्यास मध्यस्थी करणे व हिंसाचार टाळणे.
कोतवालचे कर्तव्ये:
-
गावातील कायदा-सुव्यवस्था राखणे.
-
गावातील नव्या व्यक्ती, परगावचे लोक, स्थलांतरित यांची माहिती ठेवणे.
-
कोणत्याही प्रकारच्या चोरी, मारामारी, आग लागणे यासारख्या घटनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी देणे.
-
सरकारी आदेशांची व सूचनांची अंमलबजावणी करणे.
-
ग्रामपंचायतीच्या कामकाजात सहाय्य करणे- विशेषतः निवडणुका, जनगणना, लसीकरण मोहीम इत्यादीवेळी.
-
सार्वजनिक कार्यक्रम व सण उत्सवांच्या काळात सुरक्षितता सुनिश्चित करणे.
गाव पातळीवरील प्रशासन: तलाठी आणि कोतवाल यांची कर्तव्ये आणि महसूल व्यवस्थापनातील भूमिका


