पारदर्शकतेतून विकास: वॉर्ड स्तरावर जमा होणारा टॅक्स निधी मूलभूत सुविधांवर खर्च होतो का?
15/11/2025तुमची करोडो रुपयांची संधी गमावत आहात!
22/11/2025सातबारावरील नोंदींची दुरुस्ती: 'ई-हक्क' प्रणालीचा वापर आता बंधनकारक
विषय:महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५५ नुसार लेखन प्रमाद दुरुस्ती करण्यासाठी 'इ हक्क' प्रणालीचा वापर बंधनकारक करण्याबाबत
१. लेखन प्रमाद दुरुस्तीसाठीची कायदेशीर तरतूद
कलम १५५: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम १५५ मध्ये अधिकार अभिलेखातील लेखन प्रमाद दुरुस्त करण्याची तरतूद आहे.
२. 'इ हक्क' प्रणालीचा वापर बंधनकारक करण्याचे कारण
मा. मंत्री महसूल यांनी दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार ही कार्यवाही विना विलंब करणे आवश्यक आहे.
उद्देश: लेखन प्रमाद दुरुस्तीची कार्यवाही विना विलंब पूर्ण करणे.
लेखन प्रमाद दुरुस्ती प्रक्रियेत, दुरुस्ती केवळ लेखन प्रमादाचीच करणे अपेक्षित आहे.
सदर कामकाजात विवेकाधीन बाब केवळ कागदपत्रांच्या आधारे करणे आवश्यक आहे.
या प्रक्रियेत विलंब अपेक्षित नाही, म्हणूनच कलम १५५ अन्वये ही कार्यवाही तात्काळ निर्गतीच्या दृष्टीने तहसीलदारांना जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रदान करण्यात आली आहे.
३. 'इ हक्क' प्रणाली वापरण्याबाबत वारंवार झालेल्या तक्रारी
लेखन प्रमाद दुरुस्तीसाठीचे अर्ज योग्य पद्धतीने दाखल न झाल्याबाबतच्या तक्रारी मा. विधानसभेमध्ये विधानसभा प्रश्न क्र. ७०२९८, ७५८४८, ७९८२४ द्वारे लोकप्रतिनिधींनी वारंवार मांडल्या आहेत.
या तक्रारींच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना 'इ हक्क' या फेरफार अर्ज दाखल करण्याच्या प्रणालीचा वापर करणे बाबत जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून वारंवार सूचित करण्यात आले आहे.
४. अंमलबजावणीसाठी अंतिम सूचना
सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपले अधिनस्त तहसीलदारांना शासन निर्णय वाचा, दि.२५/०७/२०२३ अन्वयेचे आदेशांची पुनश्च माहिती द्यावी.
बंधनकारक नियम: महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १५५ अन्वये दाखल करण्यात येणारे अर्ज हे ऑफलाइन स्वरूपात घेतले जाणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात.
याबाबत वेळोवेळी आढावा, कार्यालय तपासणी इत्यादी पर्यवेक्षण कामकाजाचा प्रभावी वापर करून तहसीलदारांकडून लेखन प्रमाद दुरुस्ती कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करून घ्यावी.
सातबारावरील नोंदींची दुरुस्ती: ‘ई-हक्क’ प्रणालीचा वापर आता बंधनकारक


