नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा: महानगरपालिकांच्या कामाचा संपूर्ण आढावा
15/11/2025तलाठी करतात कोणती कामे? ७/१२ उतारा, फेरफार नोंद आणि कायदा सुव्यवस्था! तुमच्या गावचे महसूल अधिकारी कसे काम करतात, जाणून घ्या.
15/11/2025MSDA: शासकीय अनागोंदीवरचा उपाय आणि रिअल इस्टेट क्रांती
- स्थापनेची गरज: शेतकरी आणि बांधकाम व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, पुणे शहरातील २० वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेले आणि स्वतः शेतकरी असलेले मा. श्री. मिलिंद बाळासाहेब पाटील यांनी या संघटनेची संकल्पना मांडली.
- संघटना: मध्यम व लघु बांधकाम व्यावसायिक संघटना, म्हणजेच M.S.D.A. (मीडियम अँड स्मॉल डेव्हलपर्स असोसिएशन) चा जन्म झाला.
- राजकीय पाठबळ: सामान्य जनतेचे हे कार्य यशस्वी करण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाची अधिकृत संघटना म्हणून MSDA चे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जमीन आणि महसूल सुधारणा:
- तुकडा बंदी कायद्यात सुधारणा करणे.
- भूसंपादन कायद्यात सुधारणा करणे.
- PMRDA च्या TP (टाऊन प्लॅनिंग) स्कीम्सना RERA कायदा लागू करून शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवणे.
पायाभूत सुविधा सुधारणा:
- रखडलेले टाऊन प्लॅनिंग रोडचे काम त्वरित मार्गी लावून ट्रॅफिक समस्येचे निराकरण करणे.
- PMRDA कडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या FSI (Floor Space Index) बाबत उपाययोजना करणे.
- DP (डेव्हलपमेंट प्लान) फायनलायझेशन प्रक्रियेत सुधारणा करणे.
आर्थिक पारदर्शकता:
- महापालिका, नगरपालिका आणि शासकीय संस्थांवर "Finance Controlling System" बसवणे, जेणेकरून सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा गैरवापर रोखला जाईल.
कॉन्ट्रॅक्टरना न्याय:
- महानगरपालिकेतील लहान कॉन्ट्रॅक्टरवर होणारा अन्याय थांबवणे आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे.
- डिजिटल पुढाकार: MSDA ने सर्व सामान्य जनता आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी खास तयार केलेल्या मोबाईल App चे उद्घाटन मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
- आवाहन: MSDA च्या या सर्व संकल्पांना पाठबळ देण्यासाठी, तसेच या मोबाईल ॲपच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात येत आहे.
गाव विकासाची चावी, तलाठी आणि कोतवालांच्या हाती! प्रशासकीय बांधणी मजबूत करूनच ग्रामविकासाचा पाया रचूया.
बांधकाम, शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी MSDA ची प्रशासकीय क्रांती! श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते Mobile App चे उद्घाटन
निमंत्रण (Invitation)
महाराष्ट्रातील शासनाचा अनागोंदी कारभार आणि त्यातून उद्भवलेल्या अनेक समस्या यामुळे अनेक शेतकरी आणि रिअल इस्टेट क्षेत्रात काम करणारे अनेक लहान मोठे व्यावसायिक अक्षरशः भरडले गेले आहेत.
-
शेतकऱ्यांच्या जमिनी वर्षानुवर्षे PMRDA, MIDC, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या ताब्यात आहेत, पण त्याचा मोबदला मिळता मिळत नाही.
-
शासन त्या जमिनी डेव्हलप करण्यासाठी इतर कोणाला देत देखील नाही.
-
त्या जमिनीचे वाद कोर्टात गेले आहेत, ज्यामुळे विकास कामे रखडली आहेत.
MSDA ची स्थापना (Establishment of MSDA)
याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, समव्यावसायिक आणि समदुःखी शेतकऱ्यांसह सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन, पुणे शहरामध्ये गेले २० वर्षे व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेले, तसेच स्वतः मूळचे शेतकरी असलेले मा. श्री. मिलिंद बाळासाहेब पाटील यांनी संघटनेची संकल्पना मांडली. त्यातून जन्म झाला "मध्यम व लघु बांधकाम व्यावसायिक संघटना म्हणजेच मिडीयम अँड स्मॉल डेव्हलपर्स असोसिएशन (M.S.D.A.)" चा.
राजकीय पाठबळ आणि कार्यारंभ
हे सामान्य जनतेचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी, मा. श्री. मिलिंद पाटील यांनी लोकनेते, शेतकऱ्यांचा जाणता राजा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभ आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षाची अधिकृत संघटना म्हणून M.S.D.A. चे काम सुरू करण्याचे ठरविले आहे.
M.S.D.A. च्या प्रमुख संकल्पना (Key Concepts)
M.S.D.A. ने आजवर पुढील संकल्पना मांडली असून, ती तुमच्यासमोर घेऊन येत आहोत:
-
तुकडा बंदी कायद्यातील सुधारणा करणे.
-
भूसंपादन कायद्यातील सुधारणा करणे.
-
महानगरपालिकेतील लहान कॉन्ट्रॅक्टरवर होणारा अन्यायाला वाचा फोडणे.
-
PMRDA च्या TP स्कीमला रेरा लागू करून शेतकऱ्यांवरील अन्याय थांबवणे.
-
टाऊन प्लॅनिंग रोडचे रखडलेले काम आणि ट्रॅफिक समस्येचे निराकरण करणे.
-
PMRDA कडून मिळावयाचा FSI बाबत उपाययोजना करणे.
-
डेव्हलपमेंट प्लान म्हणजेच DP फायनलायझेशन साठी सुधारणा करणे.
-
सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा गैरवापर रोखण्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत आणि शासकीय संस्थांवर "Finance Controlling System" बसवणे.
App चे उद्घाटन
M.S.D.A. ने सर्व सामान्य जनता आणि लहान व मोठे बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी तयार केलेल्या मोबाईल App चे उद्घाटन मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते करत आहोत.
M.S.D.A. च्या सर्व संकल्पांना पाठबळ देण्यासाठी, तसेच मोबाईल App च्या उद्घाटन सोहळ्यास आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आहे.
बांधकाम, शेतकरी आणि जनतेच्या हितासाठी MSDA ची प्रशासकीय क्रांती! श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते Mobile App चे उद्घाटन


